मधुराईमध्ये आपल्या चाहत्यांच्या उपस्थित कमल हासन यांनी आपल्या बहुप्रतिक्षीत राजकीय पक्षाची घोषणा केली. त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव ‘मक्काल नीधी मैयाम’ असे ठेवले आहे. या कार्यक्रमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही उपस्थित होते.बऱ्याच दिवसापासून भारतीय राजकारणावर आपले परखड मत व्यक्त करणारे दक्षिणेतील अभिनेता कमल हासन राजकारणात आपला हात आजमावणार असे मत जाणकार व्यक्त करत होते. ती प्रतिक्षा आज संपवत कमल हासन यांनी ‘मक्काल नीधी मैयाम’ या पक्षाची घोषणा केली. मक्काल नीधी मैयाम याचा अर्थ ‘लोकांच्या न्यायाचे केंद्र’ असा होतो. या पक्षाची विचारधारा काय असेल हे अजुनही गुलदस्त्यात आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews